आपल्या स्वतःच्या कर्ब-पदचिन्हाची मोजणी करा

कर्ब पदचिन्ह ( कार्बन फूटप्रिंट) म्हणजे काय?

कर्ब पदचिन्ह म्हणजे एखाद्या व्यक्तीने, संघटनेने वा भूप्रदेशाने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूपाने केलेल्या कृतींमुळे उत्सर्जित हरित वायुची मात्रा. (एकूण CO2 गॅस मेट्रिक टन एककात मोजून व्यक्त केलेला.) प्रत्येक घटना व उत्पादन यांचे असे पदचिन्ह मानवी कृतींच्या परिणाम रूपाने सहनिर्मित होत असते. आज हरित वायू उत्पादनास ज्या मानवी कृती मुख्यतः जबाबदार असतात त्यात वाहतूक, उद्योग, शेती व टाकाऊ व नाशकारी पदार्थ निर्मिती यांचा समावेश होतो. सर्व उत्सर्जित वायूंचे मूल उत्पादन स्थान प्रामुख्याने भूगर्भीय इंधन तेलांचा वापर हेच असते.

इथे हे लक्षात घ्यायला हवे की, सर्व मानवी कृती GHG वायूंच्या कमी वा अधिक उत्सर्जनासाठी कारणीभूत असतात. परंतु, कार्बन शोषक यंत्रांचे क्षमते द्वारे व कार्बन आकर्षित करून त्याचा साठा करू शकणार्‍या यंत्रणांद्वारे उत्सर्जन क्रियेवर काही प्रमाणात मर्यादा घालता येईल असे तंत्र विकसनाच्या पूर्णावस्थेस पोहोचलेले नाही. आपण GHG वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी करू शकतो. त्यामुळे हे प्रमाण किमान पातळीवर राखून जीवनावरील ताण तणाव कमी करू शकतो व जीवन सुसहाय्य पातळीवर राखू शकतो.

व्यक्तीचे कार्बन पदचिन्ह बदलते असते व त्यावर जीवनशैली सवयी व स्थान या घटकांचा परिणाम होत असतो. आपण हरित वायू निर्मितीस कारणभूत असतो. त्यासाठी आपण ज्या कृत्यांच्या अमलात आणणार्‍या कृतींची निवड करू त्यावरच हे प्रमाण ठरते. जसे, प्रवास करू अथवा न करू; कोणते अन्न विकत घेऊ व ते कसे वापरू अथवा न वापरताच फाेकून देऊ. कोणती विद्युत उपकरणे वापरू ती किती प्रमाणात वापरू वगैरे. अशा रीतीने आपली प्रत्येक निवड कार्बन पदचिन्ह ठरवताना महत्त्वाची आहे.

            हा दृक कार्यक्रम सहजतेने कार्बन पदचिन्हा विषयी बिनचूक माहिती देईल.

 

CFC गणकयंत्र

CFC गणकयंत्र एखाद्या व्यक्तीचे, संघटनेचे वा विशिष्ट भौगोलिक स्थानाचे कार्बन पदचिन्ह काढता येते. त्यात उत्सर्जित वायुसंबंधी मानवी कृत्यांचा हिशेब घेतला जाईल.

वैयक्तिक कार्बन पदचिन्ह म्हणजे सदर व्यक्तीने केलेल्या सर्व कृतींमुळे निर्माण झालेल्या उत्सर्जित हरित वायूंची tCO2eq एककामधे केलेली मोजणी. यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन्ही कृत्यांची गणना केली असेल. व्यक्तीने विविध कृतीसाठी वापरलेल्या सर्व ऊर्जांचा अंदाज घेऊन; अशी ऊर्जा मुख्यत्वे भूगर्भ खनिज इंधनाचे परिमाण लक्षात घेऊन, किती हरित वायू उत्पन्न झाला ते ठरविले जाईल. यात वापरलेली वीज बनविण्यासाठी जे इंधन लागले त्याचा हिशेब असेल. स्वयंपाकासाठी वापरलेली ऊर्जा त्यासाठी लागलेले पेट्रोल वायू वा नैसर्गिक वायू तसेच सर्व प्रकारचे वाहतूकीसाठी वापरले जाणारे भूगर्भीय अथवा इतर प्रकारचे इंधन लक्षात घेतले जाईल.

या शिवाय अप्रत्यक्षपणे अशी इंधने तयार होतांना वापरले जाणारे इंधन ज्यामुळे उत्सर्जित वायू निर्माण होतात याचाही हिशेब घेतला जाईल.

असे, कार्बन पदचिन्हाचे गणीत करताना सर्व घटक कृतींची संख्याशास्त्राधारीत मानके तयार करण्यात आले आहेत. त्यावरून विशिष्ट भौगोलिक प्रदेशासाठी वार्षिक आकडेवारी प्रमाणित करण्यात आली आहे. अधिकृत अंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी ही मानके तयार केली आहेत.

वैयक्तिक कार्बन पदचिन्ह म्हणजे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे निर्माण झालेली उत्सर्जित वायू. समुचित एन्व्हायरटेक या संस्थेने असे भारत देशासाठी व विशेषतः पुणे शहरासाठी तक्ते बनविले आहेत. ऊर्जा वापराविषयी अर्थपूर्ण पर्यावरण कृतीचे पहिले पाऊल म्हणून आपल्या स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या घराच्या कार्बन पदचिन्हाचे मोजमाप करून आपल्या जीवन शैलीची जाणीव करून घ्या. https://www.climatecollectivepune.org/CPC/

जीवनशैलीतील बदल

ब्रूस विलीकी त्याच्या रसपूर्ण TED Talk मधे हवामान बदलाबद्दल म्हणतात, ‘मानव निसर्गावर स्वामित्व बळाने मिळवत नाही तर ज्ञानाने मिळवतो. लोकशाही ही एक आश्‍चर्यकारी प्रणाली आहे. पण जेव्हा त्यातील बहुसंख्य लोक जे कार्य करायचे ते समजून घेऊन करतात तेव्हाच असे कार्य सुफालित होते. अशा तर्‍हेने आपल्याला एका स्थूल जाणीवेची गरज आहे. आपण एक छोटीशी पण चाणाक्ष सुरुवात करू शकतो. आपल्या वैयक्तिक जीवनात कार्बन पदचिन्ह भार किमान पातळीवर आणून एका प्रदीर्घ व गुणवत्तापूर्ण जीवन जगू शकतो. त्यासाठी खालील छोट्या गोष्टी करता येतील.

* पर्यावरण बदल विषयी केल्या जाणार्‍या विविध कार्यक्रम व योजना यांची अद्यावत माहिती करून घेणे व त्यात सक्रीय भाग घेणे.

* स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांचा जास्त वापर करणे.

* उपभोक्ता चंगळवाद टाळण्यासाठी गुणवत्तापूर्ण व दीर्घकाल वापर करता येणारी व परिणामतः कमी प्रमाणात लागणारी उत्पादने मर्यादाने वापरणे.

* कमी वापर, पुर्नवापर, वारंवार वापर व नंतर त्याग असा दृष्टिकोन राखावा; कचर्‍याचे व्यवस्थापन असावे.

* वनांचे संरक्षण, दलदलीची स्थाने, गवताळ कुरणे वगैरे सारख्या जागा निसर्गातील प्राणिमात्रांची निवास स्थाने असतात. त्यामुळे शहरातील हिरत   स्थळक्षेत्र वाढते.

* पाणी, वीज यांचा वापर योग्य प्रमाणात करावा. अतिरेक टाळावा. ऊर्जेचा वापर कार्यक्षम रितीने करणारी विद्युत साधनेच वापरावीत.

* स्थानिक खाद्यपदार्थ उत्पादन करण्याचा व वापरात स्थानिक पदार्थांना प्राधान्य द्यावे.

* प्रवास करतांना मार्ग असे राखावे की पुनः पुनः पुढे मागे हालचाल होणार नाही. लोकसेवार्थ वाहन व्यवस्थेचा वापरा करावा. चालावे; सायकल वापरावी व सामूहिक रीतीने वाहन वापरण्याचा प्रयत्न करावा.

अर्थातच लक्षात घेण्याचा महत्त्वाच मुद्दा म्हणजे कार्बन पदचिन्ह भार घटविणे म्हणजे राहणीमानाची गुणवत्ता घटविणे नव्हे. सुरुवात आपल्या घरापासूनच व्हावी.

कार्बन संकलन

कार्बन संकलन हे एक असे संकलन पात्र उपकरण असते की जिथे काही काळ पर्यंत कार्बनची संयुगे साठवली जातात. हवेतील वा पर्यावरणातील CO2 आकर्षित करून एकत्रित करून त्याची घनभौतिक स्वरूपात साठवण दीर्घ काळासाठी केली जाते.

घनभौतिकी साठवणीची एक पद्धत म्हणजे प्रकाशाधारित संयोजन. नैसर्गिक अशी तीन घनभौतिक साधने आढळतात. वनस्पती, सागर जलाशय व भूमी हे तीनही घटक उत्सर्जित हरित वायूंना मर्यादेत राखण्यास मदत करतात. म्हणूनच नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे हा उत्सर्जित कार्बन वायूंचे दुष्परिणाम कमी करण्याचा एक पर्याय ठरतो. उलटपक्षी घनभौतिक साठवण यंत्रणेला हानी पोहोचवणे वा त्यांचा विनाश केल्याने पर्यावरणात अडकून राहिलेले उत्सर्जित वायू विश्‍वाचे तापमान वाढविण्याचे साधन ठरतात.

शहरांमधे वने उपवने यांचे संरक्षण संवर्धन, जीववैविध्य रक्षण करणे ही नागरिक व शहर नियोजकांची प्राथमिक गरज राखली गेली पाहिजे. शहरात व सभोवताली डोंगर टेकड्या नद्या जलाशय जलप्रवाह पाटबंधारे उद्याने रिक्त स्थळे गवत कुरणे अशा प्रकारची स्थळे राखली विकसित केली पाहिजेत.

शहरी वने उपवने यासाठी : http://en.wikipedia.org/wiki/urban_wilderness ला भेट द्या.

तंत्रज्ञान व नवसर्जन

मुक्त स्वरूपातील हवेतील व सागरातील कार्बन (संयुगे) एकत्रित करून दीर्घकाळ साठवून धरणे या प्रक्रियेला घनभौतिक साठवण Carban Sequestration असे म्हटले जाते. अशा काही भौतिकी व रासायनिक क्रियांचा शोध घेऊन तशा प्रयोगांचा पाडताळा घेऊन घनभौतिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यात अनेक पर्याय वापरण्यात आले आहेत. जैविकघनपदार्थांवर प्रक्रिया करून असे पदार्थ BIOCHAR पुरून ठेवणे. हवेतील वा सागरातील CO2 वायू भूगर्भातील रिक्त स्थानात कुप्यांमधून साठविणे. भूगर्भातील तेल काढून घेतल्याने रिकाम्या झालेल्या जागा, महासागरांचे तळ यांचा वापर करणे श्‍नय होईल. हवेतील CO2 वायू पासून स्थिर अशा कार्बोनेट रूपात साठवण करता येईल.

सद्य काळात तरी अशा नैसर्गिक वा मानवनिर्मित घनभौतिकी पद्धतीचा वापर करण्याचे तंत्रज्ञान महाग आहे. येणारा खर्च हा होणार्‍या लाभाचे मूल्यापेक्षा अधिक आहे.


अधिक माहिती

पुणे शहराचे सद्याचे कार्बन पदचिन्ह काय आहे?

पुणे महानगर पालिकेचा पर्यावरण सद्य स्थिती अहवाल दर्शवितो की कार्बन उत्सर्जन इ.स. 2012 साली प्रति व्यक्ती 1.42 toone होते ते इ.स. 2017 मधे म्हणजे फाक्त पाच वर्षांत 1.64 tonne वाढले आहे. ही दिनांक 24 सप्टेंबरची स्थिती आहे.  Updated on 24th September 2018

https://www.hindustantimes.com/pune-news/environment-status-report-pune-s-carbon-footprint-per-person-high-due-to-large-number-of-private-vehicles/story-XiH0zNAkX5nWHokBTBEqVO.html