हवामान बदल म्हणजे काय?

‘हरित गृहे’ म्हणजे अशा संरचना की ज्यामुळे सूर्यापासून येणारी उष्णता तशीच राखली जाते. अशा संरचना क्षेत्रात तापमान टिकून धरले जाते. संपूर्ण ग्रह गोलकाला अच्छादणार्‍या कार्बन-डाय-ऑक्साइड (CO2), बाष्प, मिथेन, नायट्रोजन ऑक्साइडस् या हरित गृह वायूंच्या मिश्रणात काही क्रिया घडत असतात. त्यामुळे पृथ्वीवरील तापमान सुमारे 15OC सरासरी असे राखण्यास मदत होते.

हजारो वर्षांपासून असे स्थिर पर्यावरण राखले गेले याचे कारण निसर्गाची स्वयंसंतूलन कार्य प्रणाली होय. परंतु औद्योगिक क्रान्ती नंतर मानवी कृत्यांमुळे CO2 समान वायूंची वातावरणात मोठ्या प्रमाणात भर घातली जात आहे. असे वायू काही दशके वा शतके तसेच साठून राहिले आहेत.

हे कार्बनचे प्रमाणाधिक्य आता सुमारे 413 PPM (प्रतिदशलक्ष) पर्यंत पोहोचले आहे. याचे प्रमुख कारण अधुनिक जीवन संस्कृतीमुळे ऊर्जेची होणारी वाढती मागणी व त्यासाठी खर्ची पडणारे भूगर्भीय पुरा इंधनाचा वापर व ज्वलन.

सद्यकाळ मानवी कृतींमुळे जीव-भौतिकसाधन संग्रहावर कठोर आघात करणारा ठरत आहे आणि तो मानवीयुग (Anthropocene) म्हणून संबोधला जातो. निसर्गाकडे एक स्वयंचलित संतूलन प्रणाली आहे. मानव निर्मित उत्सर्जित CO2 आदि वायू ही मर्यादा आता ओलांडत आहेत. पृथ्वी दिने दिने तप्ततर होत आहे. पृथ्वीवरील सरासरी तापमान हळूहळू वाढत आहे.

या गरम होण्याचा व हवामानातील इतर बदलांचा परिणाम स्थानिक हवामान, ऋतुमान, तापमान, पर्जन्यमान, नवजल वितरण, सागर सीमा, महासागरातील प्रवाह या सर्वांवर दिसून येत आहेत. हे सारे घटक जीव-सृष्टी साधनांवर व मानवी जीवनावर मोठा आघात करत आहेत.

सामूहिक दृष्टिकोन का?

स्थानिक हवामान व सार्वत्रिक हवामान राष्ट्राच्या वा प्रदेशाच्या सीमा जाणत नाहीत. म्हणून परिणामदायी अशा कार्यवाही साठी वैश्‍विक सहकार्य अपेक्षित आहे. हवामानात अपेक्षित असे बदल घडविण्यासाठी प्रादेशिक सहकार्य व अनेक राष्ट्रांचे एकत्रित येणे ही सुरुवात आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेची IPCC (Inter-Governmental Panel on Climate Change) ही एक भागीदार कार्यप्रक्रिया संस्था आहे. तिचे कार्यक्षेत्र जगातील उष्णता संस्थांना-संघटनांना अशा औष्णिक घटनांवर मर्यादा घालणे व त्याचे रूपांतर अकस्तित महान आपत्ती होण्यास प्रतिबंधात्मक कृतींकडे लक्ष वेधणे असे आहे. अर्थात अशा वैश्‍विक स्तरावरील दुर्घटना रोखणे वा त्यावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.

महानगर पुणे याची लोकसंख्या इ.स. 2030मधे 80 लक्ष असेल. भारत देशाच्या हवामान विषयक दर्जासाठी पुणे महानगराचा सहभाग व वचनबद्धता महत्त्वाची असेल. ‘पुणे पर्यावरण समूह’ हा एक पुणे शहर व सभोवतालचा प्रदेश यांचा एकत्रित कार्यक्रम असेल. त्यानुसार पुण्याला त्वरित कार्यरत करून इ.स. 2030 पर्यंत ‘केवळ शून्य कार्बन’ स्थितीकडे नेणारा व भारतातील इतर शहरांसमोर आदर्श प्रस्थापित करणारा कार्यक्रम असेल.

या अपेक्षापूर्ण सामूहिक कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे अशा जनसहभागी चळवळीसाठी शहर व सभोवत प्रदेशात ‘हवामान जाणीव’ निर्माण करणे होय. नंतर क्रमाने नवा दृष्टिक्षेप ‘पर्यावरण संरक्षण’ असा राहिल. परिणामतः महत्त्वाचे सर्व क्षेत्रातील मानवी कृतीजन्य ‘पर्यावरण पदचिन्हे’ व ‘कार्बन पदचिन्हे’ घटविणे असा उद्देश राहील; जसे की शहर नियोजन, बांधकाम व्यवसाय, ऊर्जा वापर, वहातूक सेवा, जलसंसाधनाचा प्रमाणित वापर, कचरा विनीमय व्यवस्था, जैविक वैविध्य संरक्षण वगैरे.

या विषयी मूलभूत अशा कृती वैयक्तिक पातळीवर सुरू होणार्‍या आहेत. कार्याची सुरुवात समस्यांचे उगमस्थान जाणणे व नंतर कुटुंब व सामाजिक पातळीवरील कार्ये. अर्थात या कृती अर्थपूर्ण व परिणामकारी सामूहिक कृत्ये असतील. हे तत्त्व पुढे नेले जाईल व त्या कार्यात शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, उद्योगधंदे, व्यावसायिक आस्थापने व स्थानिक सरकार अशी व्याप्ती विस्तरित केली जाईल.

सद्य स्थिती काय आहे? तातडीची काय गरज?

औद्योगिक क्रान्ती नंतर; विशेषतः गेली पन्नास वर्षे मानवाकडून होणारा ऊर्जेचा अतिरेकी वापर; त्यामुळे उत्सर्जित CO2 सम हरित वायूंची मात्रा प्रचंड प्रमाणात झाल्याने वायुमंडलात असे वायू मोठ्या प्रमाणात साठून राहिले आहेत. औद्योगिक क्रान्तिपूर्व काळाच्या तूलनेत आज या वायूंचे साठ्याने फार जास्त पातळी गाठली आहे. मानवी इतिहासातील ही एक अभूतपूर्व घटना असून अज्ञात व संभाव्य धोक्याचा निर्देश करणारी आहे. आजचे तापमान औद्योगिक क्रान्ती पूर्व तापमानापेक्षा फक्त 1.5C ने जास्त असे मर्यादित राखण्याची; असे नियंत्रण करण्याची गरज आहे. हा कलन बिन्दू उल्लंघला गेला तर बेट रूपानी असलेली काही राष्ट्रे बुडून नष्ट होतील. अथवा मानवी वस्ती साठी अयोग्य ठरतील. सर्व मानवी वस्ती स्थानांना हा ‘हवामान धक्का’; या वा त्या रीतीने बसेल.

सध्याचा मार्गक्रम तसाच चालू राहिला तर इ.स. 2100 पर्यंत पृथ्वी आजपेक्षा 3C ने तप्त होईल अशी शक्यता आहे. वेगाने पुढे येणार्‍या अशा समस्या वा दुर्घटना टाळणे अजूनही शक्य आहे. सर्वनाशी परिस्थिती टाळण्यासाठी भूगर्भीय खनिज इंधनाचा वापर टाळून नव्या कमी कार्बन अर्थ व्यवस्थेकडे जाणे इष्ट ठरते. त्यासाठी नवी जीवन शैली स्वीकारावी लागेल. अशाने नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार वापर वातावरणातील हानीकारक GHG वायूंचे नियंत्रण निर्मूलन करता येईल.

शहरांनीच का बरें नेतृत्त्व करावे?

जागतिक तापमान वाढीत शहरी लोकसमुदायाचा वाटा प्रतिव्यक्ती आधारे फार जास्त आहे. म्हणूनच अशा कृतींची सुरुवात शहरी जनांकडून होणे रास्त आहे. नागरिक म्हणून संघटित समूह म्हणून शेजार निवासी व शहर निवासी म्हणून; हवामान विषयी निवड करण्यात व मागण्या करण्यात या गटांचा मोठा हिस्सा असतो. महाजालावरील कृतीशील श्री. वाइल घोनीम संदर्भासहित सांगतात, ‘लोक शक्ती ही शक्तीवान लोकांपेक्षा जास्त प्रबळ असते.’ विविध पार्श्‍वभूमीतून आलेल्या व्यक्ती, विविध वयाच्या व्यक्ती व तज्ञांनी मिळून बनलेले नागरिक गट हे एक सार्वत्रिक सशक्त व प्रातीनिधिक रूप असते. असे गट सामूहिक कृती करतात, सहभाग देतात; इतरांना सहकार्यासाठी उद्युक्त करतात. वास्तवाधारित माहितीचे सार्वत्रिक संप्रेषण करतात. ह्यामुळे भविष्यातील मानवी पिढ्यांचे संरक्षण होते. जर आज आपण काही करणार नसू तर भविष्यात अत्यंत कठोर हवामान विषयी समस्या प्रकर्षाने समोर येतील.

निसर्गाचे संरक्षण करणे व मानवी आरोग्य सुखसमृद्धीसाठी हवामान विषयी जागरूकता व त्यासाठी सामूहिक कार्यक्रम हाच एकमेव मार्ग उपलब्ध आहे.

सरकारची भूमिका काय असावी?

प्रथमतः कोणत्याही स्थानिक, प्रादेशिक वा राष्ट्रीय सरकारची भूमिका ही महत्त्वाची असते. ती नागरिकांना प्रोत्साहित करणारी, नैतिक बळ पुरवणारी अशी असावी. सरकारने पर्यावरण कार्याचे नेतृत्त्व केले पाहिजे. दृष्टिकोन सर्वसमाविष्टतेचा राखावा. ध्येय धोरणांची संरचना करावी. त्यामुळे सामान्यजन प्रोत्साहित होतील. उत्सर्जित वायूंचे प्रतिरोध कार्याची व लवचिक कार्यप्रणालीची आवश्यकता बिंबवली जाईल. हवामानात परिणामकारक बदल होण्यासाठी भूमीचा योग्य वापर; पर्यावरण व विकासाचे नियमन गरजेचे ठरतात. स्थानिक सरकारची भूमिका निर्णायक असते. ही कार्ये करताना स्थानिक/शहर नियोजन तज्ञ व नागरिकांचे सहकार्य आवश्यक असते. सरकारे यथायोग्य लक्ष्य निवडून, अनिश्‍चित सामान्य कृत्ये टाळून, अनावश्यक खर्च टाळून, समस्यांचे निराकरण करू शकतात.

भारत सरकारने पॅरिस परिषदेत प्रस्तावित केलेल्या NDC राष्ट्र निर्धार सहभाग कार्यक्रमाची उद्दिष्टे पुरी करावीत. शक्यतो ती उद्दिष्ट्ये उल्लंघावीत, अधिक यश मिळवावे. यासाठी स्थानिक सरकारांना नियोजन करून, ध्येय धोरणे राबवून, कार्बन पातळी खाली आणणारे कार्यक्रम घ्यावे लागतील.

शहर कार्बन मित्र बनविण्यासाठी, पायाभूत रचना प्रत्यक्षात आणण्यासाठी खालील दृष्टिकोन व कार्यपद्धत स्वीकारावी लागेल.

* सध्याचे प्रमुख उत्सर्जन स्रोतांची नोंदणी करणे.

* उत्सर्जन पातळी घटविण्याचे ध्येय निश्‍चित करणे, योग्य कार्यवाहीची क्षमता असणारे लक्ष्य ठरविणे.

* संभाव्य संकटांचे अंदाज बांधणे, अपयश आल्यास व्यूहरचना बदलणे.

* उत्सर्जनाचे सांख्यकी मापन व आदर्श प्रारूप व नमूने वापरणे.

* प्रकाशित/निश्‍चित केलेल्या ध्येय धोरणाच्या कार्यवाहीची नोंद व पहाणी करणे.

* वापरलेल्या व्यूहरचनेच्या यशापयशाचे नियमित/वारंवार नियंत्रण करणे.

* कार्यवाही काळात मिळणारे आर्थिक सहाय्याकडे लक्ष पुरवणे.

 


अधिक माहिती

आर्टिक तळ्यांत दीर्घकाळ भूगर्भात साठलेल्या जीवाशेष इंधनातून पृथ्वीच्या वातावरणात वायू सोडले जात आहेत

गेली काही वर्षे हे ज्ञान आहे की आर्टिक प्रदेशातील बर्फाळ तळी मोठ्या प्रमाणात वितळत आहेत. आलास्का येथे केल्या गेलेल्या अभ्यासात एक विचित्र शोध लागला. तेथील काही तळ्यातून इतर काही तळ्यांपेक्षा मोठ्या प्रमाणात मिथेन वायू सोडला जात आहे. याचे कारण या तळ्यात कार्बनचे निक्षेप आढळतात. आता त्यातून मोठ्या प्रमाणात मिथेन वायू वातावरणात सोडला जात आहे. पृथ्वीला उष्णतर करण्यात मिथेन वायूची अव्यक्त ऊर्जा कार्बन-डाय-ऑक्साइडपेक्षा अधिक असते. परिणामी मिथेन वायूची उष्णता पृथ्वीला अधिक उष्ण करून प्रचंड औष्णिक धक्का देते. वैज्ञानिकांना आता अशी चिंता वाटते आहे की अशा कायम बर्फाळ प्रदेशात असणार्‍या तळ्यातून उत्सर्जित होणारे वायू, बर्फ वितळण्याच्या क्रियेला अधिक गतिशील करतील. यामुळे अशा तळ्यांच्या बुडाशी कोंडला गेलेला मीथेन वायू अत्तापेक्षा अधिक प्रमाणात वातावरणात पसरेल. तापमान वाढल्यामुळे स्थैर्य राखणारा ‘कलन बिन्दू’ ओलांडला जाईल. त्यानंतर हवामान बदलातून निर्माण होणारी महान आपत्ती विशांतकारी घटना- मानवी हस्तक्षेप थोपवू शकणार नाही. 29 सप्टेंबर 2018
https://www.washingtonpost.com/news/powerpost/paloma/the-energy-202/2018/09/25/the-energy-202-something-strange-is-happening-with-arctic-lakes/5ba931051b326b7c8a8d1652/?utm_term=.a05de7e19ab6

हवामान  बदल : सत्य की  काल्पनिक

ब्रूस  विलीकि  यांचे  अत्यंत प्रभावी TEDxNASA  भाषण. Updated on 24th September 2018