राष्ट्रीय, प्रांतिक, लोकसमूह, कुटुंब व वैयक्तिक पातळीवर पर्यावरण समस्या, उपाय, कार्यक्रमांचा शोध घेणे. त्यासंबंधी कालबद्ध कार्यक्रम आखणे ही एक ‘संधी’ उपलब्ध आहे.

पर्यावरण सामुहिक संघ हा 2030 पर्यंत पुणे शहर कार्बन विमुक्त शहर निर्मितीसाठी व्यवहार्य व प्रत्यक्ष ध्येय राखून त्यासाठी आराखडा बनविण्यात कार्यरत आहे. योग्य मार्ग व कृती यांची निवड यासाठी महत्त्वाची आहे.

संघटित नियोजन

हरित वायू निर्मितीसाठी, बहुतेक मानवी कृती ऊर्जेचा वापर करत असल्याने मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरतात. घराची प्रकाशव्यवस्था असो, घराचे तापमान नियंत्रण असो, आहार वा स्वयंपाक क्रिया असोत, कामासाठी अथवा विरंगुळ्यासाठी केलेला प्रवास असो; त्या सर्व कृती प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष्य रीतीने CO2 उत्सर्जित करतात. त्यासाठी इंधन ऊर्जा वापरतात. प्रत्येक स्तरावर यामधे यथायोग्य पातळी राखली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी सजगता, संतूलता, तरलता पूर्वक जाणीव व त्यानुसार कृती सार्वत्रिकपणे निर्माण व्हायला हवी. आगामी काळ व येणार्‍या पिढ्यांच्या भविष्य समस्यांचे भान हवे. पर्यावरणासाठी संघटित नियोजन व कृतीशीलता हवी.

पुणे शहराची लोकसंख्या 2030 मधे एक  कोटी होईल असा अंदाज आहे. वैश्‍विक तापमान वाढीसाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे. पुण्याचे उदाहरण भारत देशातील महत्त्वाच्या शंभर शहरांनी अमलात आणले तर देशाचे पर्यावरण कृती वचनबद्धतेत मोठा वाटा ठरेल.

अर्थपूर्ण व कालबद्ध रीतीने पर्यावरण कृती करण्यासाठी सामान्य नागरिक व सरकारांना अनेक फळ्यांवर कार्य करावे लागेल. कार्बन उत्सर्जन वायू निर्मितीस प्रतिबंध व घनभौतिक साठवणीसाठी क्षमता निर्माण करावी लागेल. शहराचे कार्बन पदचिन्ह घटवायचे असेल तर सामूहिक सुयोग्य नियोजन व नियंत्रण करूनच ते शक्य आहे. त्यासाठी सर्व पातळ्यांवर सहकार्यान कार्य करावे लागेल. मुख्य ध्येय भूगर्भजन्य तेल वायू इंधनापासून दूर राहून पुनर्निमितीक्षम पर्यायी स्त्रोतांचा वापर वाढवावा लागेल. जीवनशैलीत बदल करून रोजच्या जिवनातील गरजांबाबत जाणीवपूर्वक चाणाक्ष निवडीने, समाज व राष्ट्राला प्रगती व विकास साधावा लागेल. तरच पर्यावरण र्‍हासाने होणार्‍या हानी पासून बचाव होईल.

सरकारी ध्येय धोरणे

भारत सरकारने विकास उद्दिष्टे व पर्यावरण प्रार्थमिकता यांचे संतूलन साधणारा चांगला ‘पर्यावरण विकास नियोजन आराखडा’ बनविला आहे. त्यात ऊर्जेचे जतन, जलखाद्य संरक्षण, जनआरोग्य व शिक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार केला असून आर्थिक विकासाचे महत्त्व राखले आहे.

सार्‍या अमलबजावणी कार्यात येणारी आव्हाने व न्याय्य अर्थप्रणालीत पर्यावरण कृतींचा समावेश आहेच.

आज मानव जाती समोर पर्यावरणातील बदल ही एक मोठी समस्या बनून राहिली आहे. सर्वसमावेशक प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दूरदृष्टी यांच्या प्रभावानेच पर्यावरण समस्येवर मात करता येईल. त्यासाठी मोठ्या शहरांनी एक स्थितीस्थापक आशादायी वर्तनाने समस्त देशाला गतिमान बनवायला पुढाकार घेतला पाहिजे.

पर्यावरण, ऊर्जा , दळणवळण, बांधकाम, शहर नियोजन आणि  कचरा व्यवस्थापन ही कार्बन उत्सर्जनवायू कमी करण्यासाठी विचार व कृतीक्षम प्रमुख क्षेत्रे आहेत.

पर्यावरण, ऊर्जा, वाहतूक, बांधकाम व शहर नियोजन, कचरा व्यवस्थापन कार्बन उत्सर्जनवायू कमी करण्यासाठी विचार व कृतीक्षम प्रमुख क्षेत्रे आहेत.


अधिक माहिती

Climate Collective Outreach Event on Energy and Water Conservation - 16th December 2018 Read More.

Climate Literacy Workshop (12th May 2018) organized by Pune International Centre Read More