वारंवार विचारले जाणारे काही प्रश्‍न व आव्हाने

हवामान बदल ही एक गुंतागुंतीची व वैश्‍विक घटना श्रुंखला आहे. ह्यातून अनेक प्रश्‍न व समस्या उगम पावतात. इथे आम्ही काही विविध दृष्टिकोनातून निर्माण होणार्‍या काही सामान्य प्रश्‍नांची उत्तरे देत आहोत.

उदाहरणार्थ : हवामान बदलामुळे होणारा आघात, समस्यांचे स्वरूप व त्यांच्या मर्यादा आणि समस्यांचे रूपांतर ज्या घटनांत घडते अशा प्रक्रिया.

 

GHG वायू हे दृष्यस्वरूपातील प्रदूषणकारी कणांसारखे घातक असतात का? जर नसतील तर त्यांची चिंता का बरे करावी?

GHG वायू पृथ्वीचे तापमान सुखद अशा 15OC मधे राखण्याचे कार्य करतात. अनावश्यक उष्णता बाह्यवातावरणात उत्सर्जित होण्यास अवरोध करून हे कार्य घडत असते. परंतु अतिरिक्त प्रमाणात असलेले GHG वायूंनी गरजेपेक्षा जास्त प्रमाणात उष्णता रोखून धरल्यामुळे पृथ्वीवर उष्णता वाढते. आव्हान असे आहे की GHG वायूंचे वातावरणातील प्रमाण संतूलित राखणे.

 

मानवी कृतींमुळे पर्यावरणातील उष्णतामानावर अतिरिक्त भार पडत आहे का?

सौर डागांमुळे पृथ्वीचे तापमानात भर व घट होणे स्वाभाविक वा नैसर्गिक प्रक्रिया आहे. तसेच अल नीनोमुळे हवामानावरील परिणाम घडतो. शिवाय ज्वालामुखी उद्रेक होतात. ही प्रमुख कारणे आहेत. गत 100-150 वर्षांत अनियंत्रित मानवी आर्थिक आकांक्षांमुळे निर्माण होणार्‍या भौतिक औद्योगिक कृत्यांमुळे अपरिमित उष्णता निर्माण होत आहे. हा उष्णता वाढीचा दर निसर्गाला नियंत्रणात राखण्यापेक्षा फारच जास्त आहे. उपभोग व विकास यात रास्त संतूलन राखणे आवश्यक आहे व हेच आव्हान आहे.

 

सद्य परिस्थिती चालू ठेवून निर्माण होणार्‍या समस्येवर परिणामकारी उपाय योजना शोधणे यात काय धोका आहे?

वैश्‍विक तापमान वाढ ही एक एकूणात्मक व मंदगतीने घडणारी क्रिया असून त्याचे दृष्य तत्काळ नोंद घेण्याजोगे परिणाम आढळून येत नाहीत. अशा परिणामांचे दृष्यरूप तेव्हाच आढळते जेव्हा पुनः पूर्ववत स्थिती आणणे शक्यच नसते. आव्हान हेच आहे की धोका ‘हवामान ना-परतिच्या बिन्दू’ पर्यन्त पोहोचू न देणे (CTP)

UN-IPCC ने केलेल्या अभ्यास व संशोधात असा निष्कर्ष काढला गेला आहे की 2◦C पेक्षा अधिक मात्रेने होणारी तापमानाची वाढ अनेक राष्ट्रांवर पाया ढासळणारी ठरेल. कदाचित तापमानात 2◦C पेक्षा जास्त वाढ झाल्यावर ही स्वयं पुर्ननिर्माणक्षम प्रतिसाद चक्र अधिकच वेगाने (प्रवेगाने) कार्यरत होतील. म्हणजे उष्णतेचे अधिक्य वाढेल. नवे संशोधन असा पुरावा सादर करत आहे की कदाचित 1.5◦C वाढसुद्धा अशा कलन बिन्दूला आवाहन करेल.

 

जागतिक सर्व क्षेत्रात तातडीने कार्य न केल्यास स्थिती कशी आणखीनच वाईट होईल?

आता असे पुराव्याने आढळते आहे की वैज्ञानिक संघ जागतिक उष्णता बाबत परिवर्तनविरोधी वा रुढमार्गवादी भूमिका स्वीकारत आहेत (जनसामान्यांच्या नकारात्मक भूमिका टाळण्यासाठी तसेच हवामानातील अपेक्षित बदलांपेक्षा प्रत्यक्ष बदल अधिक गतीने घडत आहेत. उदाहरणार्थ: उत्तर व दक्षिण ध्रुवांवरील बर्फाचे वितळणे, वादळे-हवा-आवर्त अधिक गतीने, उच्च स्तरीय हवेचे प्रतिआवर्तनातील बदल हवामान बदलास व दीर्घ कालीन दुष्काळांचे कारण ठरत आहेत. आगामी पिढ्यांसाठी पृथ्वीच जीवसृष्टीचे संरक्षण करणे हे मोठे आव्हान आहे.

 

मानवी कल्याणासाठी दोषदर्शी मुद्द्याबाबत अशी असहकारात्मक कृती सार्वत्रिकपणे का आढळते?

विश्‍वातील उष्णतेचे गंभीरतेने मर्यादेत नियंत्रण राखण्यासाठी भूगर्भ खनिज इंधनांच्या वापरात तातडीने घटविणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोळसा व इंधनतेल प्रचंड ताकदवान. कंपन्यांना मोठा आर्थिक धोका निर्माण होऊ शकतो. ह्या कंपन्या अतीव धन व प्रभूत्व राखून आहेत. म्हणूनच त्या कंपन्या वैश्‍विक उष्णता व त्याचे दुष्परिणाम यासंबंधी राज्यअस्थापनांवर नियंत्रण राखून, पर्यावरण संरक्षक विरोधक आहेत. लोक चळवळी द्वारा पर्यावरण संरक्षण भूमिकांची ध्येये, धोरणे सरकारांवर मागणी म्हणून मांडली जाणे हे आव्हान आहे.

 

येत्या दहा वर्षांत अशा अपेक्षित कृतीसाठी येणारा पदरमोड खर्च व अशा कृती न केल्याने पर्यायी पदरमोड खर्च अंदाजे किती असेल?

आर्थिक वर्ष 2014-15 पर्यंत वेगवान आर्थिक प्रगतीसाठी भूगर्भ खनिज इंधनाला पर्याय नव्हताच. आर्थिक मंदीची किंमत म्हणजे 1000,000,000,000 डॉलर्स तोटा ठरली असती. परंतु आता स्वच्छ पुर्ननिर्मितीक्षम ऊर्जेसाठी बाजारात स्पर्धा करू शकतील व पर्यावरण संरक्षरण करू शकतील असे पर्याय दृष्टिक्षेपात आहेत. होणारा उशीर व्यवसायात मोठ्या प्रमाणात हानीकारक, संपत्ती व मानवी जीवनास हानीकारक ठरेल. आजच सुरुवात करणे हे आव्हान आहे.

 

वैश्‍विक तापमानवाढ व हवामान बदल यांना तंत्रज्ञानाने अटकाव करता येईल का?

तर याचे उत्तर आहे की काही अटी पाळल्या तर होय. कार्बन द्रव्ये संकलित करून साठवणे हे तंत्रज्ञान विकसित होत आहे. परंतु यशस्वी असे म्हणता येत नाही. इतर तंत्रे ही विकास पथावर आहेत. परंतु संपृक्त-संपन्न अवस्थेपर्यंत पोहोचली नाहीत. येत्या 4/5 दशकात आपण वैश्‍विक उष्णतेवर ताबा राखला तर आपण ‘कलन बिन्दू’ टाळू शकतो. जसे तंत्रज्ञान संपृक्त अवस्थेपर्यंत आर्थिक दृष्टीने परवडण्यासारखे जाऊन स्थिरावले. तोवर भावी पिढ्यांसाठी स्वयंपूर्ण कार्बन मर्यादा प्रस्थापित होईल.

 

येत्या 10/20 वर्षांत पुनर्वापरक्षम ऊर्जा भूगर्भीय खनिज तेलाची जागा घेऊ शकेल का?

अर्थात इथे ही योग्य उत्तर आहे की काही अटी पाळल्या तर होय. RE पुनर्वापरक्षम ऊर्जा तंत्रज्ञानाचा स्वीकार व भूगर्भीय खनिज वापरण्याचा शेवट एका दशकात परिणामकारी होण्यासाठी काही ध्येये धोरणासंबंधीचे निर्णय सहकार्याने घ्यावे लागतील. जनसामान्यांकडून असे निम्न कार्बन Low-Carbon इंधन प्रारूप स्वीकारले जाणे आवश्यक आहे. अशा तर्‍हेने आव्हान वैश्‍विक स्वरूपाचे आहे. त्यासाठी राजकीय नेतृत्त्वाकडून चाणाक्ष जाणीव अपेक्षित आहे.

 

विश्‍वातील बहुतेक राष्ट्रे आपल्या राष्ट्राने ठरविलल्या उद्दिष्टांची NDC पूर्तता करू शकतील का?

अत्यंत अशक्य अशा कृतीत आवश्यक गती राखण्यासाठी कठोर राजकीय निर्णय घ्यावे लागतील. जसे की काही आर्थिक विकास मंदावला तरी कार्बन उपयोगावर दंडात्मक कर आकारावा लागेल. पुढे जाऊन जरी अशा स्वयंनिर्णित बंधनांची 90% यशस्वी पूर्तता केली गेली नाही तरी ही बहुकेंद्री CTP कलन बिन्दू ओलांडला जाण्याचा धोका उरतो. आव्हान आहे ते NDC ओलांडून पूर्तता करण्याचे.

 

जगातल्या महानगरांनी निष्कार्बन स्थितीसाठी का बरे करावे?

जगात 60% जनसंख्या शहरात राहणार आहे व कार्बन उत्सर्गात त्यांचा वाटा 70% असणार आहे. म्हणूनच पुण्यासारख्या शहरांनी केवल निष्कार्बन स्थिती निर्माण करण्यात लवकरात लवकर नेतृत्व स्वीकारून एक आदर्श उदाहरण घालून दिले पाहिजे. स्वयंप्रेरणेचे उदाहरणाने कृती करून इतरांपुढे आदर्श निर्माण करून ठेवणे हे मोठे आव्हान आहे.

 

अर्थजीवन महत्त्वाचे असता, निम्न कार्बन जीवनशैलीकडे का वळावे?

जनसंख्या एक हजार कोटी पर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर असतांना ऊर्जेची अशक्यप्राय भूक निर्माण करणारे आर्थिक प्रारूप टिकणार नाही. पृथ्वीकडून मिळणार संसाधनांचे स्रोत कडून सतत वाढ अपेक्षणे व जीव-वैविध्य या विषयाची मर्यादा स्वीकाराव्या लागतील. नेमस्त मर्यादाशील जीवनशैली स्वीकारावीच लागेल तरच आगामी मानवी प्रजा जगू शकेल. फासव्या अल्पकालीन योजनांचा होणारा तात्पुरता लाभ सोडून दीर्घ कालीन उपाय योजनेकडे ध्यान देणे गरजेचे आहे.

 


अधिक माहिती

ऊर्जा व जल संपदेचे जतनाचा हवामान विषयक बहिर्गामी कृतीशील प्रयत्न

CCP ने औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण विकास मंचाचे सहकार्याने व ज्ञानसागर व्यवस्थापन व संशोधन संस्थेच्या सहाय्याने एक कार्यक्रम DIMR Hall मधे 16 डिसेंबर 2018 रोजी आयोजित केला होता. अध्यक्षस्थान सन्माननीय विश्‍वस्त PIC व CCP चे कृतिशील सभासद प्रा. अमिताव मल्लीक यांनी भूषविले. खालील महत्त्वाचे विषय चर्चेस घेण्यात आले.

  1. श्री. अरविंद करंदीकर, संस्थापक व प्रमुख कार्यकारी अधिकारी व सौर ऊर्जा क्षेत्रातील सल्लागार यांनी, ‘ऊर्जा जतन व पुर्ननिर्माणक्षम ऊर्जेची भूमिका’ या विषयी विचार मांडले.
  2. श्री. रविंद्र सिन्हा सहसंस्थापक भूजल प्रचार संस्था भूजल तज्ञ व जल संरक्षण क्षेत्रातील मान्यवर यांनी ‘सामान्य व्यक्ती काय करू शकतात’ या विषयी विचार मांडले. अधिक माहिती 28 डिसेंबर 2018 पाहा.  पुढे वाचा    Published on 28th December 2018